पंजाबराव डख म्हणतात राज्यात एवढे दिवस कडक सूर्यदर्शन होणार पहा नवीन अंदाज…
पंजाबराव डख ; पंजाबराव डख यांनी आज नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार 10/ आणि 11/ऑगस्ट ला काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील परंतु 12/ऑगस्ट पासून राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस उघडणार आहे. सर्व शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी चांगला वेळ मिळणार आहे. (पंजाबराव डख हवामान अंदाज)
12/ऑगस्ट पासुन या भागात चांगले सूर्यदर्शन होणार…
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, बीड, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, नगर, नाशिक, छ. संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यात दि. 12/ऑगस्ट पासून पाऊस उघडणार असुन चांगले सूर्यदर्शन होणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
20/ऑगस्टपासुन पुन्हा पावसाचा जोर वाढणार – पंजाबराव डख
पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या अंदाजानुसार 20/ऑगस्ट पासून बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर तयार होणार असून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. या कमी दाबाच्या प्रभावाने 20/ऑगस्ट ते 02/सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
या भागात दि 17/ ऑगस्ट पर्यंत पावसाच्या सरी सुरू राहतील…
कोकण किनारपट्टीवर तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, या पट्यात दि. 17/ऑगस्ट पर्यंत पावसाच्या सरी सुरू राहतील परंतु उर्वरित महाराष्ट्रात कडक सूर्यदर्शन होणार आहे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे अधिक माहिती पाहण्यासाठी खालील YouTube video होणार पहा…