लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच या दिवशी 3000 येणार खात्यात

लाडकी बहिण योजनेचा पहिला

लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच या दिवशी 3000 येणार खात्यात…

 

लाडकी बहिण योजनाचा ; राज्य सरकारने सूरु लाडकी बहिण योजनेचा आतापर्यंत एक कोटी पेक्षा अधिक महिलाचे अर्ज अप्रोवल (Approved) झाले आहेत. ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल झाले आहेत त्या महिलांना दि. 19/08/2024 रोजी लाडकी बहिण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच वितरित करण्यात येणार आहे. 3000 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

सध्या अर्जाची छाननी सुरू असुन ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्या महिलांना अर्ज पुन्हा भरण्यासाठी सांगितले आहे. यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन हप्ते एकदाच दिले जाणार आहे. जुलै 2024 पासून या योजनेचे हप्ते महिलांना मिळणार आहेत. आता 19/ऑगस्ट रोजी अर्ज मंजूर झालेल्या महिलांना एकदाच दोन हप्त्याचे मिळुन 3000 रूपये मिळणार आहे. (लाडकी बहिण योजना)

 

ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या महिलांनी आपल्या बॅंक खात्याला आधार लिंक करून घ्यावे. कारण DBT द्वारे आधार लिंक बॅंक खात्यात हे पैसे टाकले जाणार आहेत. बॅंक खात्याला आधार लिंक नसल्यास तुम्हाला पैसे मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

 

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे किंवा अजून अर्ज भरले नाही त्या महिलांना 19/ऑगस्ट रोजी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु लाडकी बहिण योजनाचा लाभ जुलै पासून मिळणार आहे ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये तीन हप्त्याचे मिळुन 4500 रूपये एकदाच खात्यात जमा केले जाणार आहेत.

 

लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्जाचे स्टेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येते. तुम्ही जर अंगणवाडी कार्यकर्ती कडे सेतू सुविधा तसेच महा ई सेवा केंद्रात अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेट्स पाहता येईल. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्ज रिजेक्ट झाला किंवा अप्रोवल झाला त्याबद्दल मेसेज येतो तेथेही तपासता येईल. (लाडकी बहिण योजना)

 

 

 

 

हे वाचा – फवारणी पंप ; फवारणी पंपासाठी 100% अनुदान असा करा अर्ज – अर्जाची अंतिम मुदत

 

Battery Operated sprayer pump ; फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ असा करा अर्ज.

Leave a Comment