कृषी यांत्रिकीकरण योजना ; कृषी आवजारांना 50% पर्यंत अनुदान, पहा सविस्तर माहिती

कृषी यांत्रिकीकरण योजना ; कृषी आवजारांना 50% पर्यंत अनुदान, पहा सविस्तर माहिती

 

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे आणि शेती अधिक सोपी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढवणे हा आहे. यासाठी पुढील पाच वर्षांत दरवर्षी पाच हजार कोटी रुपये खर्च केले जानार आसून यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी श्रमात करता येतील….

लाडक्या बहीनींना मोठी खुशखबर – लगेच पहा

 

या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारांवर 50% पर्यंत अनुदान मिळू शकते. उदाहरणार्थ, ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% किंवा ₹1.25 लाख इतके अनुदान दिले जाते. याशिवाय रोटाव्हेटर, नांगरणी यंत्र, फवारणी यंत्र, कापणी यंत्र आणि काढणीपश्चात कामांसाठी लागणाऱ्या उपकरणांवरही अनुदान उपलब्ध आहे. या योजनेमुळे लहान आणि मोठे शेतकरीही महागडी यंत्रे खरेदी करू शकतील…

 

तुम्हाला Pm kisan चा हप्ता आला का – चेक करा

कृषी यांत्रिकीकरण योजना ; नियम / अटी

 

अनुदान मिळवण्यासाठी काही नियम आहेत…लहान आणि अल्पभूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांसाठी हे अनुदान 40% आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर योजनेच्या पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि फार्मर आयडी आवश्यक आहे… ट्रॅक्टर-चालित अवजारांसाठी अर्ज करताना आरसी बुकचीही गरज लागते…

 

या योजनेमुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी….

लाडकी बहीन योजना ; या तारखेला हप्ता येनार खात्यात, तारीख फिक्स

Leave a Comment