29 जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भ आणि कोकणात पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ३ दिवस कोकण आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
29 जूलै हवामान अंदाज
आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर कोकणातील रायगड जिल्ह्यात मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला.