लाडकी बहीन योजना ; या तारखेला हप्ता येनार खात्यात, तारीख फिक्स
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ८ ऑगस्ट २०२५ पासून पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. हा हप्ता रक्षाबंधनाची भेट म्हणून दिला जाणार आहे.
योजनेसाठी राज्य सरकारने २,९८४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानेही ४१० कोटी रुपये अनुदान म्हणून वितरित केले आहेत. त्यामुळे पात्र महिलांना लवकरच (८ आँगष्टपापुन) खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे…
लाडकी बहीन योजना ; फक्त या महिलांनाच हप्ता मिळनार
सध्या या योजनेच्या लाखो अर्जांची छाननी सुरू आहे. ज्या अर्जदारांची छाननी पूर्ण झाली आहे, त्यांनाच हा हप्ता वितरित केला जाईल. ज्या महिलांच्या अर्जांची छाननी अजून सुरू आहे, त्यांना आता हप्ता मिळणार नाही.
मात्र, ज्या अर्जांची छाननी पूर्ण होईल आणि त्या महिला पात्र ठरतील, त्यांना त्यांचे राहिलेले हप्ते नंतर मिळतील. त्यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच ऑगस्ट ८, २०२५ पासून हप्ता मिळन्यास सुरुवात होनार आहे.