रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात पाऊस कसा, उघाड कधीपर्यंत ?
रामचंद्र साबळे (जेष्ठ हवामानतज्ञ) यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील, पावसाची उघाड किती दिवस आहे आणि चांगल्या पावसाला सुरुवात कधी होई तसेच आँगष्ट महिन्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. रामचंद्र साबळै यांनी वर्तवलेला अंदाज आपण या पोष्टमध्ये सविस्तर पाहूयात…
महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात आजपासून शनिवारपर्यंत (ता.३ ते ९) १००६ हेप्टापास्कल पर्यंत वाढ होत असल्याने पावसात बराच काळ उघडीप, तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील… सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती तसेच मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्षा व नागपूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील त्यामुळे पावसाचे प्रमाण कमीच राहील अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
हवेचे दाब वाढल्याने राज्यात 9 आँगष्टपर्यं पावसाचे प्रमाण कमी राहनार आसून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. आँगष्ट महिन्यात मात्र राज्यात चांगला पाऊस होनार आहे आसेल साबळे म्हनाले.
रामचंद्र साबळे ; आँगष्ट महिन्यात चांगला पाऊस
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात इक्वेडोरजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहील. त्यामुळे हवेचे दाब अधिक राहतील. तर हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत अधिक राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कायम राहील….त्यातूनच बाष्पनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन ढगनिर्मिती होईल. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.