बॅटरी फवारणी पंप लॉटरी ; फवारणी पंपाची लॉटरी लागली पुढे काय…

बॅटरी फवारणी पंप लॉटरी ; फवारणी पंपाची लॉटरी लागली पुढे काय…

बॅटरी फवारणी पंप लॉटरी : राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी 100% अनुदानावर फवारणी पंप देण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असता लक्षांकापेक्षा कितीतरी पटीने अधिक अर्ज फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांनी सादर केले. आणि आज दि. 09/सप्टेंबर रोजी बॅटरी पंपाची लॉटरी लागली आहे.

एकात्मिक तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत कापूस, सोयाबीन या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जात आहे. फवारणी पंपाच्या वितरण संखेच्या तुलनेत चार पाच पटिने अधिक अर्ज शेतकऱ्यांनी केले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या फवारणी पंप मिळणार नाही. लॉटरी पद्धतीने या फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. जे शेतकरी या मध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.

हे वाचा – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित – रविकांत तुपकर यांच्या प्रमुख मागण्या

 

फवारणी पंपाची अखेर लाॅटरी लागली असून फवारणी पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार हि आशा तर मावळली आहे. लॉटरी द्वारे या फवारणी पंपाचे वितरण होणार असून लाॅटरी पद्धतीने जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जाणार आहे. (बॅटरी फवारणी पंप लॉटरी)

आता ज्या शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी पात्र झाल्याचा मेसेज आला आहे त्या शेतकऱ्यांना पुढे काय करावे याची माहिती कृषी विभागाकडून दिली जाईल. कृषी विभाग लवकरच याबाबत माहिती जाहीर करेल. पात्र शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे सादर करावी याबाबत कृषी विभागाने माहिती दिली की तुमच्या पर्यंत माहिती पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

खरीप हंगाम जवळपास संपुष्टात आला असून अद्याप फवारणी पंप शेतकऱ्यांना मिळालेले नाही तरी या हंगामात फवारणी पंप शेतकऱ्यांना उपयोगी पडेल हि आशा तर संपली आहे. पुढे रब्बी हंगामात हा फवारणी पंप शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.

दररोजच्या शेतीविषयक माहिती, बाजारभाव, हवामान अंदाज, शासन निर्णय, मंत्रीमंडळ बैठकीचे निर्णय, शासकीय योजना व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा तसेच हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा… धन्यवाद…

 

Leave a Comment