Ladki Bahin Yojana ; हप्ता या तारखेला होनार जमा, पहा तारीख

Ladki Bahin Yojana ; हप्ता या तारखेला होनार जमा, पहा तारीख

Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रतिमाह 1500 रुपये जमा केले जातात. महिलांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली ही योजना मात्र आता काही घटनांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. परंतु दुसरीकडे मात्र राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना वेळेवर हप्त्यांचे वितरण व्हावे याकरिता प्रयत्न सुरू असून व त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून बुधवारी जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटींचा निधी वितरित केला. त्यामुळे आता पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

प्राप्त माहितीनुसार बघितले तर, राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याकरिता 2984 कोटींचा निधी 30 जुलै रोजी वितरित केला व येत्या आठ दिवसांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. जर या योजनेची राज्यातील स्थिती बघितली तर तब्बल 26.34 लाख लाभार्थी आतापर्यंत अपात्र ठरले असून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जांची छाननी देखील सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत जे अपात्र महिला लाभ घेत आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून माहिती मागविण्यात आलेली होती व या विभागाने जो काही अहवाल दिला त्या अहवालातून दिसून आले की राज्यातील तब्बल 26.34 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत.

 

Ladki Bahin Yojana अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता?

 

यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू असून या योजनेच्या नियमानुसार बघितले तर संजय गांधी निराधार योजनेचे दोन लाख तीस हजार लाभार्थी, 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे एक लाख दहा हजार लाभार्थी, चारचाकी वाहने असलेले एक लाख 60 हजार लाभार्थी तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेचे सात लाख 70 हजार आणि सरकारी नोकरीतील 2652 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. असा सगळा एकूण अपात्र लाभार्थ्यांचा आकडा हा 26 लाखांवर पोचलेला आहे.

महत्वाचे म्हणजे वार्षिक अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या महिलांचा आकडा अजून देखील आयकर विभागाकडून यायचा बाकी आहे व हा आकडा जेव्हा येईल तेव्हा या योजनेमधील अपात्र लाभार्थ्यांच्या आकडेवारीत भर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment