अजितदादा पवार ; रक्षाबंधन पुर्वी लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार 

अजितदादा पवार

अजितदादा पवार ; रक्षाबंधन पुर्वी लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार 

 

अजितदादा पवार ; लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रूपये रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19/ऑगस्ट ला पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार होते परंतु अजितदादा पवार यांनी महिलांना मोठी ब्रेकिंग न्यूज दिली आहे. लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रूपये रक्षाबंधनाच्या आधीच महिलांना मिळणार आहे. अजितदादा पवार नेमके काय म्हणाले पाहुया.

रक्षाबंधनाच्या आधी महिलांना रक्षाबंधनाच्या सनाची तयारीसाठी पैशाची गरज असते हे पाहता अजितदादा पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 हजार रुपये 17/ऑगस्ट रोजी दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना अजितदादा पवार यांनी महिलांना भेटी दिल्या या दौऱ्यात त्यांनी हि माहिती दिली आहे.

हे वाचा – लाडकी बहिण योजनेचा अर्ज रिजेक्ट झाला ईडिट ॲप्शन आले असा करा अर्ज इडीट

 

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार महिलांना म्हणाले की लाडकी बहिण योजना पुढे सुरू राहील विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु हि योजना पुढे पाच वर्षे सुरू राहील. लाडकी बहिण योजनेतून येणाऱ्या पैशाचा वापर तूम्ही स्वतः साठी करा असेही अजितदादा पवार यांनी महिलांना सांगितले आहे.

 

पवार पुढे म्हणाले की अनेकांनी मला भावाच्या नात्याने राख्या बांधल्या फोटो काढले. आता रक्षाबंधन येत आहे. या निमित्ताने माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधन पुर्वी देण्यात येईल. 19/ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे तरी आमचा प्रयत्न चालला आहे की 17/ऑगस्ट ला जुलै-ऑगस्टचे पैसे आतापर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना द्यायचे असे अजित पवारांनी सांगितले. लाडकी बहिण योजनेच्या सहा हजार कोटींच्या फाईलवर सही करून आलो असे अजित पवार यांनी महिलांना सांगितले आहे.

आतापर्यंत अर्ज अप्रोवल (Approved) झालेल्या महिलांना 17/ऑगस्ट रोजी पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रुपये आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live