ई-पिक पाहणी ; नुकसान भरपाई पिक विमा व इतर शासकीय अनुदानासाठी ई-पिक पाहणी करा

ई-पिक पाहणी

ई-पिक पाहणी ; नुकसान भरपाई पिक विमा व इतर शासकीय अनुदानासाठी ई-पिक पाहणी करा…

ई-पिक पाहणी ; राज्यात मागच्या तिन वर्षापासून मोबाईल ॲप्लिकेशन च्या आधारे आपल्या पिकाची नोंद म्हणजे ई-पिक पाहणी केली जात आहे. या ई-पिक पाहणीच्या आधाराने शेतकऱ्यांना कर्जवाटप पिक विमा, नुकसान भरपाई चे वाटप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे अतिशय आवश्यक आहे.

भुमी अभीलेख ने मागिल तीन वर्षापासून म्हणजे (2021) पासून मोबाईल ॲप्लिकेशन लॉच केले आहे या ॲप्लिकेशन द्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून ई-पिक पाहणी करता येत आहे. पिकाची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. यंदा 2024 ला 01/ऑगस्ट पासून ते 15/सप्टेंबर पर्यंत ई-पिक पाहणी करता येईल.

यंदा भुमी अभीलेखने ई-पिक पाहणी ॲप्लिकेशन अपडेट केले असून शेतकऱ्यांना दुरूस्तीसाठी 48 तासांचा वेळ मिळणार आहे. आणि जिओ फेसिंग मुळे पिकाचा फोटो बरोबर आला की नाही हे ठरवता येणार आहे. ई-पिक पाहणीचे नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता येणार आहे.

ई-पिक पाहणी चे नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ई-पिक पाहणी करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या अडचणी येत असल्याने शेतकरी ई-पिक पाहणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ई-पिक पाहणी न केल्यामुळे शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित राहतात. ई-पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांची जमीन थेट पडिक धरल्या जाते व कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ मिळत नाही.

शासकीय अनुदानाचा लाभ तसेच पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. यंदा 15/सप्टेंबर पर्यंत ई-पिक पाहणी करता येणार आहे.

 

ई-पिक पाहणी चे नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live