अर्थसंकल्प 2024-25 ; शेतकऱ्यांसाठी निर्मला सीतारामन् यांनी केलेल्या कोणत्या

अर्थसंकल्प 2024-25

अर्थसंकल्प 2024-25 ; शेतकऱ्यांसाठी निर्मला सीतारामन् यांनी केलेल्या कोणत्या…

 

अर्थसंकल्प 2024-25 ; देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दि. 23/जुलै रोजी चालू वर्षाचा (2024-25) अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या याबाबत माहिती पाहुया..

🟡 कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 21% वाढ केली आहे.

🔵 शेतकऱ्यांसाठी राज्याच्या भागीदारीत डिजिटल पायाभूत सुविधांवर विशेष काम करण्यात येईल.

🟣 सहा कोटी शेतकऱ्यांची माहिती जमिनीच्या नोंदीमध्ये आणली जाईल.

🟠 पाच राज्यात नवीन किसान क्रेडिट कार्ड दिले जातील.

🔴 सरकारचा नैसर्गिक शेती वाढवण्यासाठी भर आहे.

🟡 नैसर्गिक शेती वाढवणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाईल.

🔵 32 पिकांचे नवीन वाण सरकार आनणार आहे.

🟣 शेती क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जाईल.

🟠 तेलबिया आणि डाळीची उत्पादकता तसेच साठवणूक वाढवण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात येईल.

वरीलप्रमाणे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केलेल्या घोषणा आहे. या अर्थसंकल्पाबद्दल अनेकांचे वेगवेगळे मते आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या आणि विशेष मागणी असलेल्या हमीभावाबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पावर संताप (नाराजी) व्यक्त होताना दिसत आहे.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live