कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार GR आला

कापूस सोयाबीन उत्पादक

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10 हजार रुपये मिळणार GR आला…

कापूस सोयाबीन ; शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 5000 रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासन निर्णय (GR) दि. 29/जुलै रोजी घेण्यात आला आहे.

2023 मध्ये अनेक ठिकाणी कमी पावसामुळे कापूस सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले होते तसेच कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर ढासळल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. महायुती सरकारने लोकसभा निवडणुकापुर्वी सोयाबीन कापूस भावांतर योजनेची घोषणा केली होती परंतु आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी करणे शक्य झाले नाही. आता या योजनेचा शासन निर्णय आला असून लवकरच शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रूपये दोन हेक्टर मर्यादेत याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल.

2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकाची नोंद ई-पिक पाहणी द्वारे केलेल्या शेतकऱ्यांना 4192 कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे.

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान ई-पिक पाहणी चा डाटा घेऊन डिबीटी द्वारे वितरित करण्यात येणार आहे. मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महायुती सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे भावांतर योजनेची अंमलबजावणी करून आपला शब्द पाळला तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारचे आभार मानले आहे.

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live