कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी ५००० रूपये पण यादीत नाव नाही

कापूस सोयाबीन अनुदान

कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी ५००० रूपये पण यादीत नाव नाही..

 

कापूस सोयाबीन अनुदान ; राज्य सरकारकडून गेल्या वर्षी (2023) मध्ये कापूस आणि सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५००० रूपये दिले जात आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती तसेच बाजारभाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर पडले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणुन दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५००० रूपये अनुदान दिले जाणार आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी द्वारे 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद केली होती त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तरी तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी लागली आहे. तरी लवकर (19/ऑगस्ट पर्यंत) सदर कृषी सहाय्यकाकडे कागदपत्रे सादर करावीत. कापूस सोयाबीन अनुदान

 

ई-पिक पाहणी केली पण यादीत नाव नाही.. 

अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची ई-पिक केली आहे परंतु ग्रामपंचायत स्तरावर लागलेल्या यादीत त्यांचे नाव आले नाही. ई-पिक पाहणी द्वारे केलेल्या नोंदीचा सातबारा डिजिटल पद्धतीने काढुन त्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद आहे का तपासावे व 2023 मध्ये ई-पिक द्वारे कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद असेल तर तात्काळ कृषी विभागाकडे संपर्क करावा व एक विनंती अर्ज सादर करावा.

 

या विनंती अर्जासोबत तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे सादर करावी. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा…

 

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live