कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ; शेतमालाला हमी भाव कधी मिळेल, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान काय म्हणतात…

कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ; शेतमालाला हमी भाव कधी मिळेल, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान काय म्हणतात…

 

कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ; देशातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेल्या हमीभावावर लोकसभेनंतर राज्यसभेतही प्रचंड गोंधळ झाला. शेतकऱ्यांना हमी भाव कधी मिळणार, असा प्रश्न समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेतकऱ्यांची सेवा करणे म्हणजे आपल्यासाठी देवाची पूजा करण्यासारखे आहे. आणि हमीभावासाठी गठीत केलेल्या समितीबद्दल सांगितले. (Map)

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, हमी भाव (एमएसपी) संदर्भात तीन उद्दिष्टांसह समिती स्थापन करण्यात आली आहे. हमीभाव प्रदान करणे आणि त्यासाठी एक पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. शेतीमालाच्या किमतीला अधिक स्वायत्तता देणे हा आणखी एक उद्देश आहे. आणि या समितीचा तिसरा उद्देश म्हणजे कृषी वितरण व्यवस्थेसाठी सूचना मिळवणे.
(Agricultural Commodity Guarantee Price)

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, आतापर्यंत हमीभावाबाबत 22 बैठका झाल्या असून आता नियुक्त समितीच्या शिफारशींचा विचार केला जाईल. या उत्तरावर सपा खासदार रामजी लाल सुमन म्हणाले की, हमीभावाबाबत तुम्ही स्पष्ट आणि थेट उत्तर द्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेला हमीभाव कधी लागू होईल याचे उत्तर द्या. (Central Agriculture Minister Shivraj Singh Chauhan)

कृषीमंत्र्यांनी सांगितले की, दरवर्षी हमी भावात सातत्याने वाढ करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. आणि समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ त्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live