खरिप 2023 साठी 7280 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर – धनंजय मुंडे

खरिप 2023

खरिप 2023 साठी 7280 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर – धनंजय मुंडे

खरिप 2023 पिक विमा ; राज्यात 2023 पासून एक रुपयांत पिक विमा योजना राबवली जात आहे. एक रूपयांत पिक विमा योजना राबवल्या मुळे आतापर्यंत सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. मागील वर्षी अनेक भागात दुष्काळ सदृश्य परीस्थिती, भीषण दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते.

नैसर्गिक आपत्तीने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात, पिक कापणी प्रयोग असे मिळून आतापर्यंत 7280 कोटी रुपये एवढा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत 4271 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप झाला आहे आणि उर्वरित पिक विमा वाटप प्रक्रिया सुरू आहे. (Crop insurance scheme)

3009 कोटी रुपयांचे पिक विमा वितरण प्रणाली सुरू असून पिक कापणीच्या अंतीम अहवालानुसार या रक्कमेत वाढ होईल असे मुंडे यांनी सांगितले आहे.

एक रूपयांत पिक विमा योजनेचा देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. तसेच पिक विमा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2023 मध्ये सर्वाधिक पिक विमा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (कृषीमंत्री धनंजय मुंडे)

Leave a Comment

Close Visit maharashtra-live