नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ; नमो चा चौथा हप्ता कधी मिळणार

नमो शेतकरी महा सन्मान निधी

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ; नमो चा चौथा हप्ता कधी मिळणार….

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ; महाराष्ट्र सरकारने पिएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पिएम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यात दिले जातात. राज्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. पिएम किसान योजनेच्या अटी/शर्ती नमो शेतकरी योजनेसाठी लागु आहेत.

नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते वितरीत झाले आहेत. राज्यातील 86 लाखापेक्षा अधिक शेतकरी नमो शेतकरी योजनेत पात्र आहे. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार…

नमो शेतकरी योजना ही पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे त्यामुळे पिएम किसान योजनेचे निकष या योजनेला लागु आहेत. पिएम किसान योजनेचा 17/वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे. या दोन्ही योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि बॅंक खात्याला आधार लिंक करणे बंधनकारक आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा आणि पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता फक्त ई-केवायसी पुर्ण असलेल्या आणि बॅंक खात्याला आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याची तारीख अद्याप सरकारने जाहीर केली नाही. कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची तारीख निश्चित केली जाईल.

 

तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तसेच पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता येणार का हे तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करु शकता. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार का हे चेक खालील लिंक वर क्लिक करा.

 

नमो शेतकरी योजनेची बेनीफिशरी लिस्ट पहा (पात्र शेतकरी यादी)

Leave a Comment

Close Visit maharashtra-live