रामचंद्र साबळे हवामान अंदाज – पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यात मुसळधार

रामचंद्र साबळे हवामान अंदाज

रामचंद्र साबळे हवामान अंदाज – पावसाचा जोर वाढनार, या जिल्ह्यात मुसळधार

 

रामचंद्र साबळे हवामान अंदाज – या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. चला तर मग या लेखातून या आठवड्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल याचा सविस्तर अंदाज पाहूया..👇

 

या आठवड्यादरम्यान, महाराष्ट्रावर 1002 हेप्टापास्कल आणि बंगालच्या उपसागरावर 998 हेप्टापास्कल एवढा कमी हवेचा दाब राहनार आसल्याने बंगालच्या उपसागरातील मान्सून शाखा सक्रिय होईल.यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढनार आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.

 

या आठवड्यात पाऊस कसा – रामचंद्र साबळे हवामान अंदाज

 

रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

मराठवाड्यात काही दिवस मध्यम तर काही दिवस हलका, विदर्भात हलका ते मध्यम, काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर काही दिवस हलका पाऊस पडेल. कोकण वगळता इतर सर्व भागात काही दिवस पावसात उघडीप राहील.

या आठवड्यात आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. पश्चिम आणि मध्य विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण मध्यम राहील.

नाशिक, धुळे, नंदुरबार धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी 22 ते 28 किमी राहील, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

 

ला निनाचा प्रभाव वाढला,पावसाचा जोरही वाढनार

 

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 15 ते 23 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे आणि विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे ‘ला-निना’चा प्रभाव वाढला आहे. त्याआधारे रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live