लाडकी बहिण योजना ; या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना मिळणार 3000 रूपये

लाडकी बहिण योजना ; या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना मिळणार 3000 रूपये…

 

लाडकी बहिन योजना ; लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रूपये दि. 17 ऑगस्ट रोजी वितरित केले जाणार आहे. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे टाकण्यात येतील. ज्या पात्र महिलांचे बँक खाते आधारशी लिंक झालेले नाही, त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या योजनेचे पैसे लाभार्थीच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जातील. अर्जदार पात्र लाभार्थ्यांपैकी 27 लाख लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेले नाहीत.

 

आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसलेल्या महिलांना पैसे वितरण होणार नसल्याने या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात यावी. तसेच योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहु नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करावा, असे तटकरे यांनी सांगितले.

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पुढे म्हणाल्या कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट नसून अर्ज प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. दि. 31 ऑगस्टनंतर योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केला आहे त्यांना 17 ऑगस्ट रोजी दोन हप्त्याचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही अशा महिलांना आधार क्रमांक त्यांच्या खात्याशी जोडल्यानंतर हे पैसे खात्यात पडतील. योजनेतून कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.

 

17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लवकर लिंक करावेत, असेही तटकरे यांनी यावेळी केले.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live