लाडकी बहिण योजनेचा अर्ज या कारणास्तव रिजेक्ट झाले ; अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज

लाडकी बहिण योजनेचा अर्ज या कारणास्तव रिजेक्ट झाले ; अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे…

लाडकी बहिण योजना ; सध्या संपूर्ण राज्यात लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले जात आहे. आणि आतापर्यंत केलेल्या अर्जाची तपासणी करून अर्ज मंजूर, नामंजूर होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक अर्ज रिजेक्ट झाले आहेत आणि रिजेक्ट होण्याची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. पाहुया कोणत्या चुकीमुळे अर्ज रिजेक्ट होत आहेत.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरताना काही कागदपत्रे नसल्यास किंवा अर्जात चुका असल्यास व कागदपत्रे अपलोड करताना चुका झाल्यास अर्ज रिजेक्ट होत आहे. तुम्ही तुमचा अर्ज कसा भरला हे तुम्हांला (Edit) चे ॲप्शन असल्यास चेक करून दुरुस्त करु शकता.

खालील कारणांमुळे लाडकी बहिण योजनेचे अर्ज रिजेक्ट होत आहे.

🔵 नावात बदल : अनेक अर्जात राशन कार्ड वरील नाव व आधार कार्ड, पासबुक वरील नाव यामध्ये बदल आहे. त्यामुळे सुद्धा अर्ज रिजेक्ट होत आहे.

🔴 अनेक अर्जात कागदपत्रे एका बाजूने अपलोड केले आहे त्यामुळे सुद्धा अर्ज रिजेक्ट होत आहे. कागदपत्रे दोन्ही बाजूंनी अपलोड करणे आवश्यक आहे.

🟣 अर्ज करताना बॅंक पासबुक अपलोड न केल्यास अर्ज रिजेक्ट होत आहे.

🟡 पत्ता पुरावा (ॲड्रेस) आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड वर एकाच ठिकाणचा पत्ता असने आवश्यक आहे.

🟠 कागदपत्रे सर्व अपलोड न केल्यामुळे सुद्धा अर्ज रिजेक्ट होत आहे.

🔵 बॅक तपशील ; अर्ज करताना बॅंक खाते क्रमांक चुकिचा किंवा IAFC नंबर चुकीचा असल्यास अर्ज रिजेक्ट होत आहे.

🔴 आधार कार्ड बॅंक लिंक ; तुमचे आधार कार्ड बॅंकेला लिंक नसल्यास तुमचे अर्ज रिजेक्ट होत आहे.

🟣 हमीपत्रात खुणा ; हमीपत्रात खुणा असने आवश्यक आहे जर खुणा नसतील तर अर्ज रिजेक्ट होत आहे.

🟡 बॅंक खाते वैयक्तिक ; अर्ज करताना वैयक्तिक बॅंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे जर वैयक्तिक खाते नसेल तर अर्ज रिजेक्ट होत आहे.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज रिजेक्ट होण्याची वेगवेगळे कारणे समोर आले आहे. जर तुम्ही अर्ज दाखल केला असेल आणि तुम्हांला (edit) चे ॲप्शन येत असेल तर तुम्ही अर्जात बदल करू शकता. जर भरला नसेल तर व्यवस्थित भरा. आणि जर ईडीट चे ॲप्शन येत नसेल तर काही काळ प्रतीक्षा करा लवकरच नवीन पर्याय येतील.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live