लाडकी बहिन योजना ॲप ; लाडकी बहिन योजनेचा अर्ज असा असेल तर होईल रद्द

लाडकी बहिन योजना

लाडकी बहिन योजना ॲप ; लाडकी बहिन योजनेचा अर्ज असा असेल तर होईल रद्द

लाडकी बहिन योजना ॲप ; पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातील. आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र या योजनेचे तीन-चार शासन निर्णय आले असल्याने प्रत्येक जीआरमध्ये वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक महिलांनी घाईघाईने अर्ज केल्याने आणि अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती नसल्याने कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने अपलोड झाले असल्याची शक्यता आहे. (Mukhymantri mazi ladki bahin yojna 2024)

लाडकी बहिन योजनेसाठी तुमचा अर्ज योग्य आहे का ते तपासा, तुमचा अर्ज बरोबर नसेल तर एकदा अर्ज दुरुस्त करता येईल. लाडकी बहिन योजनेच्या अर्जात एकदाच सुधारणा करता येते. त्यामुळे, अर्जात कोणतेही बदल करावयाचे असल्यास ते काळजीपूर्वक आणि योग्यरित्या केले पाहिजेत.

 

लाडकी बहिण योजना कोणते अर्ज रद्द होऊ शकतात?

लाडकी बहिन योजनेसाठी अर्जाची कागदपत्रे अपलोड करताना आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या दोन्ही बाजूचा फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही फक्त एक बाजू अपलोड केल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. जर तुम्ही आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या एकाच बाजूचा फोटो देखील अपलोड केला असेल तर तुमचा अर्ज रद्द होण्यापूर्वी तुम्ही तो देखील दुरुस्त केला पाहिजे. (Mukhymantri mazi ladki bahin yojna online registration)

हे वाचा – पावसाचा जोर पुन्हा वाढणार ; हवामान विभाग प्रमुख होसाळीकर

 

लाडकी बहिन योजनेचा अर्ज रद्द होण्यापूर्वी म्हणजेच तो प्रलंबित (pending) असताना तुमचा अर्ज दुरुस्त करा. या नारी शक्ती धुत ऍप्लिकेशनमधून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता. अर्ज दुरुस्त करताना काळजी घ्या कारण अर्ज एकदाच अपडेट केला जाऊ शकतो. अर्ज दुरुस्त करण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या दोन्ही बाजूंचा फोटो सेव्ह करा आणि नंतरच अर्ज अपडेट करा.

अर्ज कसा दुरुस्त करायचा याबद्दल अधिक माहितीसाठी, खालील YouTube व्हिडिओ पहा….

 

हे वाचा – ई-पिक पाहणी ; नुकसान भरपाई पिक विमा व इतर शासकीय अनुदानासाठी ई-पिक पाहणी करा

 

ई-पिक पाहणी ; नुकसान भरपाई पिक विमा व इतर शासकीय अनुदानासाठी ई-पिक पाहणी करा

Leave a Comment

Close Visit maharashtra-live