50 हजार प्रोत्साहन अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार केवायसी करण्याचे आवाहन

50 हजार प्रोत्साहन अनुदान

50 हजार प्रोत्साहन अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार केवायसी करण्याचे आवाहन

 

50 हजार प्रोत्साहन अनुदान ; महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (2019 अंतर्गत) आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयाचे 50 हजार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आले आहे. परंतु, या योजनेंतर्गत पात्र असलेल्या 33 हजार 356 शेतकऱ्यांचे ईकेवायसी न झाल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही.

अशा शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. याबाबत संबंधित बँकांनी खातेदारांनाही माहिती द्यावी, अशा सूचनाही सहकार विभागाने दिल्या आहेत. (50 हजार प्रोत्साहन अनुदान)

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयाद्वारे सहकार विभागामार्फत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे आणि 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन आर्थिक वर्षांमध्ये नियमितपणे त्याची परतफेड केल्यास 50,000 रूपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते.

हे वाचा – लाडकी बहिण योजनेचा अर्ज करा नवीन पद्धतीने ; संपूर्ण माहिती (स्टेप बाय स्टेप)

 

प्रोत्साहन अनुदान साठी पात्र असलेल्या 15 लाख 44 हजार पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांची ईकेवायसी पुर्ण झाली आहे ईकेवायसी पुर्ण केलेल्या कर्ज खात्यांपैकी 14 लाख 40 हजार कर्ज खात्यांसाठी 5,222 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.

 

ईकेवायसी करण्यासाठी विशिष्ट क्रमांक कुठे मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

पात्र असून ईकेवायसी पुर्ण न झाल्याने 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ईकेवायसी पुर्ण करण्याचे अवाहन सहकार विभागाने केले आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live