लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात ; वित्त विभागाला खर्चाची चिंता

लाडकी बहिण योजना वादाच्या

लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात ; वित्त विभागाला खर्चाची चिंता…

लाडकी बहिण योजना ; पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. सध्या लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहे. परंतु आता लाडकी बहिण योजना वादाची भोवऱ्यात अडकली आहे. या योजनेच्या खर्चाबाबत वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

लाडकी बहिण योजनेवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून त्याबाबत वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आणि लाडकी बहिण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबत वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

 

लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत 40 लाखांपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तरी योजनेसाठी लागणारा खर्चाची चिंता (46 हजार कोटी) वित्त विभागाला भेडसावत आहे. सध्या राज्यावर 7.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना हि योजना राबवने कितपत योग्य आहे अशी चर्चा सध्या अर्थ खात्यात सुरू आहे.

अर्थ खात्याच्या अक्षेपानंतर सरकारमधील नेते कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहिण योजना राबवण्यास ठाम आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार आल्यावर सुद्धा हि योजना राबवणार असल्याचे शिंदे गटाचे मंत्री सांगतात.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live