Ration card details तुम्हाला रेशन किती मिळते चेक करा आपल्या मोबाईल वर

Ration card details

Ration card details तुम्हाला रेशन किती मिळते चेक करा आपल्या मोबाईल वर…

Ration cord details दर महिन्याला आपण रेशन आणायला रेशन दुकानात जातो पण आपल्याला सरकारकडून किती रेशन येते आणि त्यासाठी किती पैसे लागतात हे कधी चेक केलय का. रेशन दुकानदार आपल्याला किती रेशन देतो आणि किती पैसे घेतो याची आपण कधी ऑनलाईन पडताळणी केली आहे का. अनेक रेशन दुकानदार ग्राहकांना फसवत कमी रेशन देतात किंवा जास्त पैसे घेतात. अशी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून केंद्र सरकारने mera ration या मोबाईल ॲप्लिकेशन जारी केलेले आहे या ॲप्लिकेशन द्वारे तुम्हाला सर्व माहिती पाहता येते. (Government scheme)

Mera ration या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे राशन ग्राहकांना आपल्याला सरकारकडून किती रेशन येते तसेच त्यासाठी किती पैसे लागतात याची संपूर्ण माहिती कशी पहावी याबाबत माहिती पाहुया… (Ration card)

1) सर्वप्रथम प्ले स्टोअर वरुन mera ration हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा व ॲप्लिकेशन open करून परमिशन द्या.

2) ॲप्लिकेशन उघडल्यानंतर तेथे भरपूर पर्याय आहे त्यामध्ये know your entitlement या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर पुढे आधार नंबर ला क्लिक करून घरातील कोणत्याही सदस्याचा आधार नंबर टाका व सबमिट करा.

3) यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे एक बाॅक्स दिसेल येथे तुम्हाला राशन किती येते त्यासाठी किती पैसे लागतात किती राशन फ्रि येते याबाबत संपूर्ण माहिती दिसेल.

येथे ऑनलाईन ला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला रेशन मिळत नसेल तर तुम्ही रेशन दुकानदाराची तक्रार तुम्ही तहसील कार्यालयात करु शकता. तसेच आपल्या मोबाईल मधुन सुद्धा ऑनलाईन तक्रार करता येते.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live