E-pic pahni ; ई-पिक पाहणी सुरू वेळेत ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन

E-pic pahni

E-pic pahni ; ई-पिक पाहणी सुरू वेळेत ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन…

 

E-pic pahni ; राज्यात मागिल तीन वर्षापासून भूमी अभिलेखने आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. आपल्या मोबाईलवरून आपल्या शेताच्या बांधावर बसुन आपल्याला ई-पिक पाहणी करता येते. या पिकाच्या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पिक विमा, कर्जवाटप केले जाते. ई-पिक पाहणी शिवाय कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ मिळत नाही म्हणुन ई-पिक पाहणी करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

यंदा भुमी अभिलेखने ई-पिक पाहणी ॲप्लिकेशन मध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणेमुळे शेतकऱ्यांना 48 तासात ई-पिक पाहणी मध्ये बदल किंवा सुधारणा करता येणार आहेत. ई-पिक पाहणी करण्यासाठी 15/सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिलेला आहे.

नेटवर्क प्रोब्लेम मुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे शेतकरी ई-पिक पाहणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ई-पिक पाहणी करणे अतिशय आवश्यक आहे. ई-पिक पाहणी केलेली नसेल तर कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

 

ई-पिक पाहणीचे नवीन वर्जन (2024) डाऊनलोड करा.

 

ई-पिक पाहणी कशी करावी याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live