ऑगस्ट हवामान अंदाज ; ऑगस्टमध्ये 22 दिवस पावसाचा खंड ; ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.

ऑगस्ट हवामान अंदाज

ऑगस्ट हवामान अंदाज ; ऑगस्टमध्ये 22 दिवस पावसाचा खंड ; ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज...

ऑगस्ट हवामान अंदाज ; हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने ऑगस्टचा दिर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे या अंदाजानुसार मध्य उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरी पेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर हवामान तज्ञाकडुन ऑगस्टमध्ये मराठवाड्यात 22 दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

जुलैमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरी एवढा किंवा काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पावसाची नोंद आहे. ऑगस्टमध्ये मात्र मराठवाडा आणि विदर्भात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकापुरता पाऊस पडला असला तरी धरणे तलाव मात्र कोरडेच आहेत. आणि ऑगस्टमध्ये 22 दिवसांचा खंड पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

ऑगस्टमध्ये खंड कालावधीत शेतकऱ्यांना पिकांना सिंचन करण्याचे नियोजन करावे असे आवाहन हवामान तज्ञाकडुन केले जात आहे. ऑगस्टच्या खंडानंतर सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे कारण ला-निना सक्रिय होईल असे अंदाज हवामान तज्ञाकडुन दिले जात आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live