लाडकी बहिण योजना विरोधात हायकोर्टात जनहित याचीका दाखल ; मराठीत भरलेले अर्ज रिजेक्ट होणार का

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना विरोधात हायकोर्टात जनहित याचीका दाखल ; मराठीत भरलेले अर्ज रिजेक्ट होणार का

लाडकी बहिण योजना ; राज्य सरकारने राज्यातील 21 ते 64 या वयोगटातील महिलांसाठी दर महिन्याला 1500 रूपये याप्रमाणे वार्षिक 18000 रूपये लाडकी बहिण योजनेअंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. लाडकी बहिण योजना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली असून दररोज या योजनेत आवश्यक बदल केले जात आहे. लाडकी बहिण योजनेचे महत्त्वाचे दोन अपडेट या लेखात जाणून घेऊया.

 

मराठीत भरलेले अर्ज रिजेक्ट होणार का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडकी बहिण योजना सुरू केली तेव्हा या योजनेचे अर्ज इंग्रजी भाषेत भरावे असे स्पष्ट सांगितले होते. परंतु नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन मध्ये मराठी भाषा उपलब्ध असल्याने जवळपास 70% महिलांनी मराठी भाषेत अर्ज भरले होते. परंतु मराठीत भरलेले अर्ज रिजेक्ट होणार अशी माहिती समोर येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्च दरम्यान मराठीत भरलेले सुद्धा अर्ज मंजूर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

लाडकी बहिण योजने विरोध हायकोर्टात जनहित याचीका दाखल…

ॲडव्होकेट ओवस पेचकर यांनी लाडकी बहिण योजने विरोध हायकोर्टात जनहित याचीका दाखल केली आहे. सरकारवर आधीच 7.5 कोटी रुपयांचा बोजा असुन या योजनेसाठी वार्षिक 46 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर अजुनच भार पडणार असल्याने तात्काळ लाडकी बहिण योजनेला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली आहे.

या याचिकेवर तात्काळ (06/ऑगस्ट रोजी) सुनावणी होणार असून निर्णय घेतला जाणार आहे. लाडकी बहिण योजना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाहीर केली असल्याचे त्यांनी या याचिकेत सांगितले आहे. या याचिकेवर कोर्ट काय निकाल देणार याबाबत 06/ऑगस्ट रोजी स्पष्ट होईल…

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live