Battery Operated sprayer pump ; फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ असा करा अर्ज.

Battery Operated sprayer pump

Battery Operated sprayer pump ; फवारणी पंपासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ असा करा अर्ज…

 

Battery Operated sprayer pump ; शेतकऱ्यांना फवारणी साठी आवश्यक असलेला फवारणी पंप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्विकारले जात असून 14/ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. शेतकऱ्यांना बॅटरी पंप मोफत दिला जाणार आहे. (Battery Operated sprayer pump)

कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती साठी आवश्यक अवजारे, यंत्रे अनुदानावर दिले जातात. फवारणी पंपासाठी 100% अनुदान असुन शेतकऱ्यांना मोफत वितरीत केले जाणार आहे. (बॅटरी पंप) फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर 14/ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बॅटरी पंपासाठी अर्ज करावेत असे अवाहन केले आहे.

Battery Operated sprayer pump बॅटरी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा…

1) सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर युजरआयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. (महाडीबीटी पोर्टल अधिकृत संकेतस्थळ लिंक)

(https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login)

2) अर्ज करा वर क्लिक करा

3) त्यानंतर (कृषी यांत्रिकीकरण) या पर्यायावर क्लिक करा.

4) मुख्य घटक बाबींवर क्लिक करा – कृषी यंत्र खरेदी साठी अर्थसहाय्य.

5) तपशील बाबींवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे या पर्यायावर क्लिक करा.

6) यंत्र अवजारे व उपकरणे वर क्लिक करून पिक संरक्षण औजारे निवडा.

7) मशीनचा प्रकार निवडून बॅटरी स्वयंचलित फवारणी पंप निवडा. (गळीत धान्य कापूस किंवा सोयाबीन निवडा)

8) अर्ज जतन करा व मेनू वर जाऊन अर्ज सादर करा.

सदर अर्ज स्वतः किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन करावा…

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live