DAP, 10-26-26 च्या नावाने शेतकऱ्यांना विकली माती या कंपनीवर गुन्हा दाखल

DAP, 10-26-26

DAP, 10-26-26 च्या नावाने शेतकऱ्यांना विकली माती या कंपनीवर गुन्हा दाखल

 

DAP, 10-26-26 ; खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खताची आवश्यकता असते. डिएपी, 10-26-26, युरीया यासारख्या खताची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या संधीचा फायदा काही कंपन्या घेत असुन शेतकऱ्यांची फसवणूक करतात. बनावट खताची विक्री करून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जाते.

यंदा 2024 मध्ये डिएपी, 10-26-26 या दोन्ही खताची पुणे येथील रामा फर्टिकेम लि. नावाच्या कंपनीने 3300 डिएपी आणि 10-26-26 या महाग खताच्या नावे 46 लाख रुपयांची माती विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामा फर्टिकेम चे जबाबदार अधिकारी विकास रघुनाथ नलावडे यांच्यावर नगर पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (DAP, 10-26-26)

डिएपी मध्ये 18% नत्र आणि 46% स्फुरद हे दोन्ही घटक असतात परंतु रामा फर्टिकेम च्या खतामध्ये अर्ध्याहून कमी घटक आहेत. तसेच 10-26-26 मध्ये सर्व माती असल्याचे जिल्हा अधिक्षक राहुल सातपुते यांनी सांगितले आहे. या प्रकरणात कंपनी सह विक्रेत्यांवर सुद्धा कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (DAP, 10-26-26)

शेतकऱ्यांना खते औषधी एवढ्या महाग दरात घ्याव्या लगतात आणि कवडीमोल दरात शेतमालाची विक्री करावी लागते आणि असे बनावट खत पदरी पडल्यावर शेतकऱ्याचे सर्व मेहनत वाया जाते. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना तपासणी करून नंतर खरेदी करावी तसेच खरेदीचे पक्के बिल घ्यावे.

 

 

हे वाचा – तुमचा पिकविमा (2023) मंजूर आहे का चेक करा तुमचे स्टेट्स

Crop insurance status ; तुमचा 2023 चा पिकविमा मंजूर आहे का चेक करा

Leave a Comment

Close Visit maharashtra-live