लाडकी बहिण योजना किती दिवस चालणार अजितदादा पवार यांचे वक्तव्य

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना किती दिवस चालणार अजितदादा पवार यांचे वक्तव्य…

 

लाडकी बहिण योजना ; महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणे तसेच रिजेक्ट झालेले अर्ज दुरूस्त करणे आणि बॅंक खात्याला आधार लिंक करणे यासारख्या कामाला विविध वेग आलेला आहे. तसेच काही महिलांकडून लाडकी बहिण योजना किती दिवस चालणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली योजना पुढेसूद्धा सुरू राहणार का याबाबत महिलांकडून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा प्रसंगी जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे देत येत्या 17/ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रूपये एकदाच जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. विरोधक टिका करत असले तरीही मि कालच 6000 कोटींच्या फाईल वर सही केली असल्याचे पवार यांनी सांगितले. लाडकी बहिण योजना

 

लाडकी बहिण योजना किती दिवस चालणार – अजितदादा पवार

नाशिक येथे काढलेल्या जन सन्मान यात्रेत अजितदादा पवार यांनी महिलांच्या मनात असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले की येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला (महायुती सरकार) परत संधी दिली तर पुढचे पाच वर्षे लाडकी बहिण योजना सुरळीत चालू राहिल असे माझे वचन आहे असे पवार यांनी सांगितले आहे.

महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील 2.50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेचे पैसे जुलै 2024 पासून दिले जाणार असून येत्या 17/ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिण्याचे मिळुन 3000 रुपये महिलांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

लाडकी बहिण योजना

 

हे वाचा – पंजाबराव डख म्हणतात या भागात सूर्यदर्शन होईल तर या भागात पाऊस सुरू राहणार

Weather forecast ; पंजाबराव डख म्हणतात या भागात सूर्यदर्शन तर या भागात पावसाचा अंदाज

Leave a Comment

Close Visit maharashtra-live