Cotton soyabin subsidy ; कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज सुरू अशी प्रोसेस असणार

Cotton soyabin subsidy

Cotton soyabin subsidy ; कापूस सोयाबीन अनुदानासाठी अर्ज सुरू अशी प्रोसेस असणार…

Cotton soyabin subsidy ; मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले होते तसेच बाजारभाव खुपच घसरले होते. या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकारने हेक्टरी 5000 रूपये दोन हेक्टर च्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शासन निर्णय आला असून अनुदान वितरण प्रणाली सुरू झाली आहे.

 

ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनची ई-पिक पाहणी द्वारे नोंद केली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहाय्यकाकडे अर्ज भरून द्यायचा आहे. या अर्जामध्ये आधार संबंधित माहिती वापरण्याची परवानगी द्यायची आहे. या अनुदानाचे वितरण DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात केले जाणार आहे.

 

या अनुदानाची वितरण प्रणाली सुरू केली असून लवकरच हे अर्ज कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध होतील व ते अर्ज भरून द्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधार लिंक बॅंक खात्यात हे अनुदान जमा केले जाणार आहे. कृषी सहाय्यकाकडे अर्जाची PDF लिंक खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाकडे संपर्क करून हा अर्ज भरून द्यावा. या अनुदानाचे वितरण 15/ सप्टेंबर आधी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

तुम्हाला हे अनुदान मिळणार का तसेच तुम्ही गेल्या वर्षी (2023) कोणत्या पिकांची ई-पिक पाहणी केली होती हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा…

PDF link

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live