Havaman aandaj ; या भागात पावसाचा जोर ओसरला येथे मुसळधार बरसणार

Havaman aandaj

Havaman aandaj ; या भागात पावसाचा जोर ओसरला येथे मुसळधार बरसणार…

Havaman aandaj ; राज्यात बऱ्याचश्या भागात पावसाने उघडीप दिली असून कडक सूर्यदर्शन झाले आहे. तसेच दुपारच्या तापमानात चांगली वाढ झालेली दिसत आहे. ढगाळ वातावरण आणि दुपारचे उन अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. हवामान विभागाने पुढे चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या वायव्य मध्यप्रदेश तसेच शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे त्याच्या प्रभावाने राज्याच्या काही भागात हलक्या सरी बरसत आहेत. आज हवामान विभागाने गोंदिया, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला आहे.

 

 

हवामान विभागाने उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण ,मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार 19/ऑगस्ट पर्यंत युपी, बिहार, सिक्कीम, उत्तराखंडचा काही भाग तसेच पुर्वेकडील राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच दक्षिणेतील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान महाराष्ट्रात पर्जन्यमान कमी राहिल.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live