Weather forecast ; आजचा हवामान अंदाज आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस.

Weather forecast ; आजचा हवामान अंदाज आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस..

Weather forecast ; अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी अधुन मधुन बरसत आहेत. पावसाने उघाड दिल्यामुळे दुपारच्या उन्हात वाढ झाली आहे. आज हवामान विभागाने पुढे दोन दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर विदर्भात दोन जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार राज्यातील बहुतांश भागात यलो अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याला रेड अलर्ट तर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसात जोरदार वारे आणि विजाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे तरी पाऊस सुरू होताच सुरक्षित ठिकाणी थांबावे.

 

आज विदर्भात सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात रेड अलर्ट असुन मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे व गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे व उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे व जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live