Crop insurance खरिप पिक विमा भरण्यासाठी फक्त एवढे दिवस बाकी….

Crop insurance

Crop insurance खरिप पिक विमा भरण्यासाठी फक्त एवढे दिवस बाकी….

Crop insurance ; खरिप पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली होती. पिक विमा भरण्याची मुदत आता फक्त चार दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 31/जुलै /2024 हि खरीप पिक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे. खरीप हंगामातील पिकाचा पिक विमा तुम्ही अजून भरला नसेल तर 31/जुलै हि शेवटची तारीख आहे.

नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी पिक विमा नोंदणी अवश्य करावी. गेल्या वर्षी पासून राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. शेतकरी हिश्शाची रक्कम राज्य सरकारकडून भरली जात आहे.

दोन वर्षापासून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याची टाळाटाळ केली जात आहे. वेळेवर पिक विमा मिळत नाही आणि विमा कंपनीची मनमानीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. तरीही पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त एक रुपया लागणार असल्याने योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

यंदा हवामान खात्याने सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिक पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने पिक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अजून पिक विमा भरला नाही त्या शेतकऱ्यांनी या तीन चार दिवसांत पिक विमा नोंदणी पुर्ण करावी.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live