Havaman aandaj ; पुढील चार पाच दिवस या भागात मुसळधार पाऊस…

Havaman aandaj

Havaman aandaj ; पुढील चार पाच दिवस या भागात मुसळधार पाऊस…

Havaman aandaj ; सध्या राज्यातील मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. कोकणात मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बरसत आहे. आज हवामान विभागाने पुढील चार पाच दिवसात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

IMD ने पुढील चार पाच दिवस राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 24 ते 48 तास मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकणात वरच्या स्तरावरील सतर्कतेचा ईशारा दिला आहे. हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी ट्विटरवर द्वारे हि माहिती दिली आहे.

 

आज संपूर्ण कोकण किनारपट्टी, नाशिक, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे तर सातारा जिल्ह्याला सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उद्या 04/ऑगस्ट ला नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे आणि मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नगर, सांगली,सोलापुर,लातुर,धाराशीव जिल्हे सोडता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी केला असून जोरदार पावसाचा अंदाज आहे.हवामान विभागाने पुढचे चार पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live