Hawaman aandaj या भागात यलो अलर्ट या भागात पावसाचा जोर वाढणार

Hawaman aandaj

Hawaman aandaj या भागात यलो अलर्ट या भागात पावसाचा जोर वाढणार…

 

Hawaman aandaj ; संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासून काही ठिकाणी अधुनमधून पावसाची रिपरीप सुरू आहे. आज हवामान खात्याने 17 जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असुन उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघाड देणार असल्याचे सांगितले आहे. आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर सह विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे तसेच विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

मागील दोन आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. हवामान विभागाने पुढचे पाच दिवस संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघाड देणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान विभागाने दिलेले पुढिल पाच दिवसाचे जिल्हानिहाय इशारे खालीलप्रमाणे पहा.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live