Insurance pement ; या दोन जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांना 301 कोटींचा पिकविमा मिळणार.

Insurance pement

Insurance pement ; या दोन जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांना 301 कोटींचा पिकविमा मिळणार…

 

Insurance pement ; चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात 2023 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीने मर्यादित कालावधीत कारणे देता अपात्र केले आहे. अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करून 31/ऑगस्ट पर्यंत पिकविमा वाटपाचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023 रब्बी हंगामासाठी 119 कोटी तसेच खरीप हंगामासाठी 55 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील 127 कोटी 74 लाख रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. याबद्दल सर्व शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री धनंजयमुंडे यांचे आभार मानले आहे. Insurance pement

 

पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे क्लेम करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी 73 तासानंतर केलेले क्लेम विमा कंपनीने रद्द केले होते.

पिक नुकसानीच्या तक्रारी 72 तासापेक्षा जास्त कालावधी झाल्याने विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकविमा वाटपासाठी अपात्र केले होते. या अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना 31/ऑगस्ट पर्यंत पिकविमा वाटपाचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन अपात्र शेतकऱ्यांना पिकविमा वाटपाचे निर्देश दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. Insurance pement

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live