Kapus tannashak कापुस पिकात तननियंत्रनासाठी 20/ 30 दिवसात ही तननाशके वापरावे.

Kapus tannashak

Kapus tannashak कापुस पिकात तननियंत्रनासाठी 20/ 30 दिवसात ही तननाशके वापरावे.

कापुस पिकाचे उगवणीनंतर तणांचे नियंत्रण करणे खुप महत्वाचे असते. कापसाच्या दोन ओळीचे अंतर जास्त असल्याने आणि कापसाची वाढ सुरुवातीला हळूहळू होत असल्याने कापुस पिकात सुरुवातीला तनांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत असतो. कापसाला सुरुवातीचे 50/60 दिवस जनमुक्त ठेवणं खुप महत्वाचे असते. अन्यथा पिकाची योग्य वाढ व पोषण होत नाही..

Cotton spre लागवडीपूर्वी जमिनीची मशागत केल्याने म्हणजेच नांगरणी,वखरणी व बैलपाळ्या यामुळे सुद्धा तनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. तनांचे जुने अवशेष शेताबाहेर टाकल्यास पुढील हंगामात तनांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. कापुस पिकांच्या दोन ओळीचे अंतर जास्त असल्यास डवरणी , बैलपाळ्या , वखरणी करणे जास्त दिवस शक्य होते. त्यामुळे सुद्धा तनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण होते. शेतात हराळी , लव्हाळा , यासारखी गवत असल्यास बैलपाळ्या, खुरपणीचे काम चांगले करता येत नाही.

सध्या मजुरांच्या टंचाईमुळे रासायनिक तननाशकाच्या वापराकडे शेतकर्याची ओढ वाढत आहे. कोणत्याही तननाशकाचे काही फायदे तोटे असतात. सततच्या पावसाने खुरपणी , बैलपाळ्या ही आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तननाशकाचा वापर करावा.

Cotton spre कापुस पिकामधे खालीलपैकी कोणत्याही तननाशकाचा वापर करता येतो.

1) Pyrithiobac Sodium (10% EC) कापुस पिक 20 ते 30 दिवसाचे असल्यावर या तननाशकाची फवारणी करावी. कापुस पिकात याचे वापरण्याचे प्रमाण 12.5 ml ते 15 ml 10 लिटर पाण्यामधे मिसळुन फवारणी करता येते. फवारणी केल्यानंतर पाच ते दहा दिवस डवरणी करू नये.

2) (बायर घासा) Pyrithiobac sodium (6%) + Quizalofop Ethyl (4% MEC) ; या तननाशकाचा वापर कापुस पिक 20-30 दिवसाचे असताना करावा . याचे प्रमाण 10 लिटरच्या पाण्यासाठी 20 ते 25 ml एवढे आहे. हे तननाशक बायरचे घासा या नावाने उपलब्ध होईल . तननाशकाची फवारणी केल्यावर पाच ते दहा दिवस डवरणी, खुरपणी करु नये.

3) (धानुका टारगा सुप्पर) Quizalofop Ethyl (5% EC) ; धानुका चे टारगा सुपर कापुस पिकात याचा वापर पिक 30 ते 40 दिवसाचे असतानी करावा.कापूस पिकात याचे वापरण्याचे प्रमाण 20/ml 10 लिटर पाण्यासाठी करावा .याच्या वापरानंतर पाच ते दहा दिवस खुरपनी डवरणी करु नये.

4 ) ( UPL SWEEP POWER ) Glufosinate ammonium (13.5% W/W SL) ; याचा वापर कापुस पिकामधे कापुस 20 ते 30 दिवस असताना करावा. याचे वापरण्याचे प्रमाण 50-60 ml.10 लिटर पाण्यासाठी आहे. हे UPL चे स्वीप पावर या नावाने उपलब्ध होईल. तननाशकाची फवारणी करताना त्यासोबत कोनतेही किटकनाशकाचा वापर करु नये.

यापैकी कोणत्याही एका तननाशकाचा वापर करून तन नियंत्रण मिळवता येते.

 

तननाशक फवारताना घ्यावयाची काळजी.

1) तननाशक कंपन्यानी सांगितले त्याच प्रमानात वापरावे, कमी जास्त करू नये.
2) कडक उन्हात तननाशकाची फवारणी करणे टाळावे.
३) तननाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचुन घ्यावे.
४) पाऊस आसताना तननाशकाची फवारणी करू नये.
५) सततच्या पावसाने खुरपणी,बैलपाळ्या ही आंतरमशागत करणे शक्य होत नाही. अशा वेळी तननाशकाचा वापर करावा.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live