Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या महिलांना ४५०० रुपये देणार

Ladki bahin yojna

Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या महिलांना ४५०० रुपये देणार..‌

 

Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील ज्यांचं उत्पन्न २.५० लाखांपर्यंत आहे अशा महिलांना दर महिन्याला १५०० रूपये याप्रमाणे वर्षाला १८००० रूपये दिले जाणार आहे. येत्या १७/ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळुन १४/ऑगस्ट पर्यंत अर्ज अप्रोवल असलेल्या महिलांना ३००० रूपये बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत.

 

१४/ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल आहेत अशा महिलांना दोन हप्त्याचे मिळून ३००० रूपये येणार आहे पण यानंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रोवल होतील किंवा यापूढे ज्या महिला अर्ज करतील अशा महिलांना या दोन हप्त्याचे पैसे येतील का या प्रश्नाचे उत्तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ज्या महिला ३१ ऑगस्ट रोजी अर्ज करतील त्या महिलांचे अर्ज सप्टेंबर मध्ये अप्रोवल होतील अशा महिलांना सप्टेंबर मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे मिळुन ४५०० रूपये एकदाच जमा केले जाणार आहेत त्यामुळे महिलांना काळजी करण्याचे कारण नाही. (Ladki bahin yojna)

 

सध्या लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरळीत चालू आहे तरी अजून कुणाचं अर्ज भरणे बाकी असेल तर अर्ज करू शकता.नवीन पोर्टलवर लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणे सोपे झाले आहे. पहिल्या प्रमाणे आता मोबाईल ओटीपी ची गरज राहिलेली नाही तरी संपूर्ण कागदप्रत्रासह काळजीपूर्वक अर्ज करावा.

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live