Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात…

Ladki bahin yojna ; लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात…

Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे 17/ऑगस्ट रोजी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे आणि DBT द्वारे दि. 14/ऑगस्ट पासून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला हे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का जर नसेल आला तर 17/ऑगस्ट पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

 

ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे तसेच अर्ज मंजूर असलेल्या महिलांचे बॅंक खात्याला आधार लिंक असले पाहिजे तरच लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तुमचा अर्ज मंजूर असेल आणि जर तुम्हाला 17/ऑगस्ट पर्यंत लाडकी बहिण योजनेचे पैसे 3000 रूपये जमा झाले नाही तर तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन आधार लिंक करुन घ्यावे. ज्या महिलांचे बॅंक खात्याला आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असेल त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतील.

 

दि. 14/ऑगस्ट पासून लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्याचे मिळून 3000 रूपये खात्यात जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. जर तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने 17/ऑगस्ट पर्यंत पैसे मिळाले नाही तर लवकर तुमचे आधार लिंक करून घ्यावे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने पैसे जमा न झाल्यास आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव झाल्यावर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतील कोणताही लाभार्थी या योजनेतून वंचित राहणार नाही असे मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून हि माहिती दिली आहे.

 

तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले का हे पहा. तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज आला असेल नसेल आला तर 17/ ऑगस्ट पर्यंत प्रतीक्षा करा नंतर आपले बॅंक खाते चेक करा. जर पैसे जमा नसेल झाले तर आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव आहे का ते तपासा खात्याला आधार लिंक झाल्यावर तुमच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा केले जातील.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live