mahabhumilink कापुस आणि सोयाबीनचे हेक्टरी 5000 रुपये तुम्हाला मिळणार का चेक करा.

कापुस आणि सोयाबीनचे

mahabhumilink कापुस आणि सोयाबीनचे हेक्टरी 5000 रुपये तुम्हाला मिळणार का चेक करा…

 

mahabhumilink ; मागील वर्षी दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच कापूस आणि सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली घसरले होते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन आणि कापसाची विक्री करावी लागली होती. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने भावांतर योजनेची घोषणा केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने भावांतर योजनेची अंमलबजावणी करता आली नसल्याचे सरकारने सांगितले आहे.

महाभुमी पोर्टलवर गेल्या वर्षीचा सातबारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादेत देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान गेल्या वर्षीचा ई-पिक पाहणीच्या आधारे दिले जाणार आहे. मागील वर्षी तुम्ही जेवढ्या क्षेत्राची कापूस आणि सोयाबीनची ई-पिक पाहणी केली होती त्या आधारे हे अनुदान दिले जाणार आहे. महाभुमी अधिकृत संकेतस्थळ लिंक  (https://mahabhumi.gov.in/mahabhumilink#)

 

महाभुमी पोर्टलवर गेल्या वर्षीचा सातबारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

गेल्या वर्षी तुम्ही किती क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीन ची ई-पिक पाहणी केली होती हे महाभुमी च्या अधिकृत संकेतस्थळ मागील वर्षाचा 7/12 वर पाहता येईल. महाभुमी पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर UL या पर्यायावर क्लिक करून जिल्हा, तालुका, गावाचे नाव नंतर सर्वे क्रमांक टाका नंतर तुम्हाला 2023 चा ई-पिक पाहणी चा सात बारा डाऊनलोड करा. 2023 च्या सातबारा वर तुम्हाला किती क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनची ई-पिक केली होती हे पाहता येईल. या ई-पिक पाहणी द्वारे तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचे हेक्टरी 5000 रूपये दोन हेक्टर मर्यादेत याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे.

महाभुमी पोर्टलवर गेल्या वर्षीचा सातबारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live