Mahavitran solar pump new application on सोलार पंपासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज

Mahavitran solar pump new application on

Mahavitran solar pump new application on सोलार पंपासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज

Mahavitran solar pump new on application शेतकरी मित्रांनो नमस्कार, सोलार पंपासाठी राज्यातील शेतकऱ्यांचा असलेली मागणी लक्षात घेता राज्यात सोलार पंपाचे उदिष्ट वाढवले जात आहे. तसेच महावितरण च्या माध्यमातून पून्हा एक लाख सोलार पंपाचे वितरण केले जाणार आहे. यासाठी अर्ज सुरू करण्यात आले आहे. तरी महावितरण कडून सोलार पंप घेण्यासाठी कोणत्या अटी शर्ती शेतकऱ्यांना पुर्ण कराव्या लागतात तसेच महावितरणकडून कोणत्या शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया. (Solar pump application)

(Solar pump) सोलार पंप योजनेत महाराष्ट्र देशात एक नंबर वर असुन राज्यात कुसुम सोलार योजनेप्रमाणेच महावितरण कडून आणखी एक लाख सोलार पंप वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी महावितरण कडून एक नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे. जर तुम्हाला महावितरण कडून कृषी सोलार पंपाचा लाभ घेयाचा असेल तर त्याच्या अटी खालील प्रमाणे आहेत. (Mahavitran solar pump application)

 

महावितरण सोलार पंपासाठी खालील शेतकरी पात्र, अपात्र (solar pump)

महावितरणकडून सोलार फक्त ज्या शेतकऱ्यांना कोटेशन भरून अजून विजेची जोडणी झाली नाही त्या शेतकऱ्यांना महावितरण कडून सोलार पंप दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी यापूर्वी कुसुम सोलार पंपासाठी अर्ज केला असेल आणि अर्ज करताना आधार क्रमांक दिला असेल तरीही या शेतकऱ्यांना महावितरण कडून सोलार पंपासाठी अर्ज दाखल करता येणार नाही. तुम्ही जर विजेच्या जोडणीसाठी पैसे भरले असेल आणि तुम्ही जर प्रतीक्षा यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला महावितरण कडून सोलार पंपासाठी अर्ज करता येईल.

महावितरणकडून सोलार पंपासाठी अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे तुम्ही जर महावितरण कडे विजेच्या जोडणीसाठी पैसे भरले असेल आणि तुम्ही जर प्रतीक्षा यादी मध्ये असाल आणि तुम्ही सोलार पंपासाठी इच्छुक असाल तर तुम्ही ग्राहक क्रमांक टाकून महावितरण कडे सोलार पंपासाठी अर्ज करू शकता. अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती पहा.

 

सर्वप्रथम महावितरण च्या अधिकृत संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट द्या त्याची लिंक वर दिलेली आहे. त्यानंतर पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का ?” येथे Yes बटन वरती क्लिक करा. त्यानंतर आपल ग्राहक क्रमांक तेथे टाका. आणि शोधा पर्याय वरती क्लिक करा. त्यानंतर आपली सविस्तर माहिती दाखविली जाईल. पुढे आपली सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा आणि त्यानंतर आपल्याला एक यूजर आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाइल वरती पाठविण्यात येईल.पुढे आपल्याला परत खालील लिंक वर आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे आणि आपला फॉर्म पूर्ण भरून कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावयाचा आहे. अधिक माहिती साठी आपल्या लाईनमेंन शि संपर्क करा.

 

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live