Nuksaan bharpaai ; नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत शासन निर्णय आला.

Nuksaan bharpaai

Nuksaan bharpaai ; नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत शासन निर्णय आला…

Nuksaan bharpaai ; जुन ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी आणि पुर परीस्थिती या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास वाढिव दराने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती जसे चक्रीवादळ, दुष्काळ, भुकंप, पुर, त्सुनामी, गारपीट, दडड कोसळंने,ढगफुटी, थंडीची लाट आली तर 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार केंद्र सरकार 75% तर राज्य सरकार 25% मदत देते.

नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत (2024)  शासन निर्णय येथे पहा 

 

या नैसर्गिक आपत्ती मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, विज पडणे, समुद्राला उधाण आणि आकस्मिक आग तसेच सततचा पाऊस याचा नैसर्गिक आपत्ती मध्ये समावेश 2023 च्या शासन निर्णयानुसार महसूल विभागाने घेतला आहे. दि. 19 ते 23 जुलै/ 2023 मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना पुरेशी मदत व्हावी याकरीता दि.28 जुलै/2024 च्याशासन निर्णयान्वये अट शिथिल करुन विशेष दराने मदत मंजूर करण्यात आली होती.

 

2024 च्या पावसाळी हंगामामध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सुध्दा अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरीकांना पुरेशी मदत तातडीने मिळावी याबाबत मा. मंत्रिमंडळाच्या दि. 30 जुलै, 2014 च्या बैठकीत, दि. 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार मंजूर केलेल्या विशेष दरास १ वर्षाने मुदतवाढ देण्याबाबत निदेश देण्यात आले आहेत तरी खालील प्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे.

जून ते ऑक्टोबर 2024 या चालू पावसाळी हंगामामध्ये कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता खालील बाबींकरिता विशेष दराने मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत (2024)  शासन निर्णय येथे पहा 

 

 

 

हे वाचा – लाडकी बहिण योजना किती दिवस चालणार अजितदादा पवार यांचे वक्तव्य

 

https://maharashtra-live.in/लाडकी-बहिण-योजना-किती/ ‎

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live