Pikvima 2023 पिकविमा न मिळण्याची कारणे आणि चुका जाणून घ्या.

Pikvima 2023

Pikvima 2023 पिकविमा न मिळण्याची कारणे आणि चुका जाणून घ्या..

 

Pikvima 2023 : राज्यात 25% पीक विमा वितरीत करण्यात आला आहे आणि आता कापणी प्रयोग अहवाला नंतर, उर्वरित पीक विमा पात्र महसूल विभागातील शेतकऱ्यांना वितरित केला जात आहे. पिकविमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना 25% विम्याची रक्कम मिळाली आहे आणि 75% पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जात आहे, परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. अशा स्थितीत पीक विम्याचे पैसे का मिळाले नाहीत, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. तुम्हाला पीक विमा का मिळत नाही आणि तुमच्याकडून काय चुका झाल्या आहेत तसेच, तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही ते सविस्तर पाहूया आणि तुम्हाला पिकविमा मिळेल की नाही याची संपूर्ण माहितीपाहुया. (Pikvima news 2023)

 

सरकारच्या नवीन नियमांनुसार, आता सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचे तसेच पीक विमा, नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदानाचे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात. त्यामुळे तुमचे खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तपासा. पिकविमा भरताना दिलेला खाते क्रमांक विचारात न घेता, पिक विमा फक्त आधार लिंक केलेल्या खात्यात जमा केला जात आहे.

 

पीक विमा न मिळण्याची कारणे विमा (विम पॉलिसी नियम)…

 

१) तुमचा पीक विमा अर्ज फेटाळला गेला किंवा त्रुटी मध्ये असेल, तर तुम्ही पीक विमा लाभांपासून वंचित राहाल…

 

२) तुमचे पूर्वीचे कोणते खाते तुमच्या आधारशी लिंक केलेले आहे ते तपासून तुम्हाला विमा मिळाला आहे का ते तपासा…

 

3) काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि काही जिल्ह्यात कापूस किंवा इतर पिकांसाठी पीक विमा मंजूर झाला आहे. तुम्ही ज्या पिकासाठी पीक विमा भरला आहे त्या पिकासाठी तुमच्या महसूल मंडळात पीक विमा मंजूर झाला आहे का ते तपासा…

 

4) विमा कंपनीच्या नियमांनुसार ई पिक पाहणी अनिवार्य आहे, जर तुम्ही ई पिक पाहणी केली नाही तर तुम्ही पिकविमा लाभांपासून वंचित राहू शकता.

 

तुम्हाला पीक विमा मिळेल की नाही हे पीक विम्याची स्थिती कशी तपासायची…

 

पीक विमा स्थिती शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही थेट विमा कंपनीला फोन करून विचारू शकता की तुम्हाला पीक विमा मिळेल की नाही. तुमच्या विमा नोंदणी पावतीवरील विमा कंपनीच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तुम्हाला कंपनीकडून पीक विमा मिळाला का? मिळेल का? याशिवाय कोणत्या पिकासाठी किती रक्कम मिळाली याची संपूर्ण माहितीही दिली जाणार आहे.

Leave a Comment

Close Visit maharashtra-live