Ramchandra sable ; या आठवड्यातील पावसाचा अंदाज या भागात उघडीप

Ramchandra sable

Ramchandra sable ; या आठवड्यातील पावसाचा अंदाज या भागात उघडीप…


Ramchandra sable ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी या आठवड्यातील अंदाज व्यक्त केला आहे.या आठवड्यात महाराष्ट्राच्या उत्तर भागात १००४ हेक्टापास्कल तर दक्षिण भागात १००६ हेक्टापास्कल एवढा हवेचा दाब राहिल. त्याचा परिणाम थेट पावसावर होईल व काही काळ उघडीप राहिल. तसेच कमाल तापमानात ३१अंशापर्यत वाढ होईल व किमान तापमान २३ अंशापर्यत असेल. (Ramchandra sabale havaman andaj)

या कालावधीत आकाश ढगाळ राहील व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे,नगर या जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने २१ किमीपर्यत राहिल व पावसाच्या प्रमाणात घट होईल. (Weathar forcost todye)

या आठवड्यात कमाल तापमानात ३१ अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होईल पण पिकांच्या वाढीसाठी तापमान आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैऋत्येकडुन असेल गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते कोकणात विस्तृत पावसाची शक्यता आहे.

प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान १४ ते २२ अंशापर्यत राहिल.ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात ला-निना च्या प्रभावाने पाऊस वाढणार आहे. तसेच हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान ३० अंशापर्यत राहिल त्यामुळे सुद्धा पावसाची शक्यता वाढणारं आहे. (August weadhar forcost)

Leave a Comment

Close Visit maharashtra-live