Reshim lagvad aanudan yojana रेशीम शेतीसाठी शासनाचे 3 लाख 42 हजार रुपये अनुदान.

Reshim lagvad aanudan yojana

Reshim lagvad aanudan yojana रेशीम शेतीसाठी शासनाचे 3 लाख 42 हजार रुपये अनुदान…

 

रेशीम शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून 03 लाख 42 हजाराचे अनुदान दिले जाते. शेतीला जोडधंदा तसेच शेतीपूरक म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. ज्या शेतकऱ्याकडे बारामाही सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी रेशीम शेतीकडे (Reshim lagvad aanudan yojana) वळू शकतात. रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली सामग्री तसेच कुशल मजुरीसाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ कसा घ्यावा याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया..

तुती लागवड आणि जोपासणी यासाठी शासनाकडून 895 दिवसाची माणसाची मजूरी म्हणून 02 लाख 29 हजार रुपये तर इतर सामग्री साठी 01 लाख 13 हजार 780 रुपये असे सर्व मिळुन 03 लाख 42 हजार 900 रुपये एवढे अनुदान दिले जाते.

 

रेशीम शेती म्हणजे काय ?

रेशीम हे भारतातील एकमेव नगदी पिक आहे जे 30 दिवसात उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येते. रेशीम शेतीला तुती लागवड सुद्धा म्हणतात. रेशीम शेती ही इतर पिकासारखी नसून त्यापेक्षा वेगळी आहे. रेशीम शेती मध्ये किड्यांचे संगोपन करावे लागते. त्यासाठी त्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यासाठी तुतीची लागवड केलीजाते. किड्यांच्या संगोपनासाठी एका शेडची आवश्यकता असते. किडीच्या संगोपनासाठी कमी जागा लागत असली तरी खाद्य निर्मीती म्हणजे तुती लागवडीसाठी तुम्हाला शेतीची आवश्यकता आहे..

 

तुती लागवडीसाठी लाभार्थीं निवडीच्या अटी/शर्ती… 

रेशीम शेतीसाठी लाभार्थ्याकडे पाण्याचा निचरा होणारी जमीन असने आवश्यक आहे तसेच तुती साठी आवश्यक सिंचनाची सोय असणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार करून लाभार्थी निवड केली जाते…

रेशीम लागवड अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे ….

1) जमिनीचा 7/12 आणि 8अ उतारा..

2) बॅक पासबुक

3) आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

4) पासपोर्ट फोटो

5) मनरेगा च्या जाॅबकार्डची झेरॉक्स

 

रेशीम लागवड अनुदानासाठी अर्ज कुठे करावा..

रेशीम लागवड योजना हि मनरेगा च्या माध्यमातून राबवली जाते. तरी लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा. तसेच पोखरा योजनेअंतर्गत सुद्धा हि योजना राबवली जाते तेथेही अर्ज करता येतो…

रेशीम शेतीसाठी शासनाकडून किती अनुदान दिले जाते ? रेशीम शेतीसाठी शासनाकडून संपूर्ण 03 लाख 42 हजार एवढे अनुदान दिले जाते. 

रेशीम शेती साठी इच्छुक शेतकऱ्यांना सदर योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. रेशीम शेती हि शेतकऱ्यांना लवकर परतावा देते. शेतीला जोडधंदा तसेच शेतीपूरक म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. ज्या शेतकऱ्याकडे बारामाही सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी रेशीम शेतीकडे वळू शकतात धन्यवाद… (Reshim lagvad aanudan yojana)

Leave a Comment

Close Visit maharashtra-live