Soyabin market ; सोयाबीनचे बाजार वर्षभरात 40 टक्क्यांनी पडले भविष्यात बाजार कसे राहतील

Soyabin market

Soyabin market ; सोयाबीनचे बाजार वर्षभरात 40 टक्क्यांनी पडले भविष्यात बाजार कसे राहतील…

Soyabin market ; सोयाबीनचे बाजारभाव साधारण वर्षभरात जवळपास 40 टक्क्यांनी कमी झाले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव सर्वात कमी झाले आहे. अमेरिकेचे सोयाबीन पुढील महिन्यात बाजारात येणार आहे तसेच भारताचे सोयाबीन ऑक्टोबर मध्ये बाजारात येणार आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधी सोयाबीनचे बाजारभाव चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आहेत. सोयाबीनचे बाजारभाव कमी होण्यामागे महत्त्वाचे तिन कारणे आहेत. (Soyabin market)

 

सोयाबीनचे बाजारभाव कमी होण्यामागे महत्त्वाचे कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेतील सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज. पुढच्या महिन्यात अमेरिकेचे सोयाबीन बाजारभाव येईल व तसेच मागिल हंगामातील सोयाबीनची शेतकरी विक्री करत आहेत. त्यामुळे सोयाबीन ऑगस्ट मध्ये (2020) च्या पातळीवर पोहोचले आहे. (Soyabin market)

 

सोयाबीनचे बाजारभाव कमी होण्यामागे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेचे उत्पादन वाढण्याच्या अंदाजानंतर मार्केट मध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. तसेच तिसरे कारण म्हणजे उत्पादन वाढण्याच्या अंदाजाच्या बातमीने मार्केटमध्ये मंदीचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे सोयाबीन बाजारभावात तेजी येण्यासाठी परीस्थिती अनुकूल नाही.

 

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिने सोयाबीन साठी अतिशय महत्त्वाचे असतात. कारण या दोन महिन्यात अमेरिका आणि भारतातील सोयाबीन फुलोरा, शेंगा अवस्थेत असते. या दोन महिन्यात उत्पादनाचे अंदाज येत असतात. उत्पादनांच्या अंदाजाच्या रिपोर्ट नंतर बाजारात चढ उतार होऊ शकतात.

 

Soyabin market आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या मंदीच्या परीणाम देशातील सोयाबीन बाजारावर होत आहे. सोयाबीनचे येत्या हंगामात किती उत्पादन राहिल तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहिल यावर सोयाबीनचे बाजारभाव अवलंबून असतील. सध्या लागवड वाढलेली आणि पाऊस पुरेसा असल्याने उत्पादन वाढण्याचे अंदाज आहे. परंतु उत्पादन प्रत्यक्ष हाती किती येईल हे काढणीच्या वेळी स्पष्ट होईल त्यावर पुढचे चित्र असेल. सध्या मात्र सोयाबीन बाजारावर मंदी दिसत आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live