Soyabin news ; सोयाबीनची हमीभावाने खरेदी होणार मुंडेच्या प्रयत्नांना यश…

Soyabin news ; सोयाबीनची हमीभावाने खरेदी होणार मुंडेच्या प्रयत्नांना यश…

Soyabin news ; राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढे 90 दिवसांत 1.3 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पणन विभागाला सोमवारी अधिकृत पत्र प्राप्त होणार असून ‘नाफेड’ आणि ‘एससीसीएफ’च्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे.

 

या योजनेंतर्गत उडीद खरेदी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे या दराने खरेदी केली जाईल. सध्या राज्यात सोयाबीनचे भाव कमालीचे गडगडले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीनचे भाव सलग दुसऱ्या वर्षी घसरले आहेत. मागील वर्षीची तफावत भरून काढण्यासाठी हेक्टरी 5000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी कार्यालयाला पत्र पाठवून ‘नाफेड’ व ‘एससीसीएफ’मार्फत हमीभावावर सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी केली होती.केंद्रीय कृषी विभागाने सोशल मीडियावर कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यातील सोयाबीन खरेदीची माहिती दिली आहे. या तीन राज्यांमध्ये किमान हमी भाव योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली असून या योजनेंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘एससीसीएफ’ यांसारख्या नोडल एजन्सीमार्फत तसेच राज्यस्तरीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

ही योजना पुढील 30 दिवस सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत उडीद सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे. राज्य कृषी महोत्सवानिमित्त केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान परळीत असताना कृषीमंत्री मुंडे यांनी सोयाबीन खरेदीची मागणी केली होती आणि दिल्लीतही बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. तसेच राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व बाजारभावात घसरण झाल्याने त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live