सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का पडणार ; बाजार अभ्यासकांनी चिंता वाढवली… 

सोयाबीनचे बाजारभाव वाढणार का पडणार ; बाजार अभ्यासकांनी चिंता वाढवली… 

 

 

सोयाबीनचे बाजारभाव ; गेल्या हंगामापासून सोयाबीनचे बाजारभाव पडलेले आहेत. लवकरच नवीन सोयाबीन बाजारात येणार असून येत्या हंगामात सोयाबीनला कसा बाजारभाव मिळेल याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. सध्या सोयाबीनचे बाजारभाव चार वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत तसेच पुढील काळात सोयाबीन बाजारावर मंदीचे सावट अभ्यासकांकडुन वर्तवले जात आहे. 

 

 USDA ने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जागतिक उत्पादनात 8.5% नी वाढ होणार आहे. यामध्ये अमेरिकेत उत्पादनात 10% वाढ होऊन 1249 लाख टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. परंतु सध्या अमेरिकेचे सोयाबीन उभे असून फुलोरा शेंगा अवस्थेत आहे त्यामुळे या उत्पादनात कमी अधिक होण्याची शक्यता आहे. तसेच ब्राझील चे उत्पादनात सुद्धा 10% वाढ होईल व उत्पादन 1690 टनापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सोयाबीनचे बाजारभाव

 

जागतीक उत्पादन वाढण्याच्या बातमीने सुद्धा सोयाबीन बाजारावर परीणाम होत असल्याचे अभ्यासक सांगतात. गेल्या पुर्ण हंगामात सोयाबीनचे बाजारभाव 4000 ते 4400 च्या दरम्यान होते यंदा सोयाबीनच्या जागतिक वारसा वाढ होण्याचा अंदाज वर्तवला असला तरी सोयाबीन थेट मार्केट पर्यंत येईपर्यंत यामध्ये बदल होऊ शकतात. 

 

आपले सोयाबीन ऑक्टोबर मध्ये तयार होऊन बाजारात येते तोपर्यंत जागतिक बाजाराचा नवीन अंदाज येईल त्या अंदाजानुसार यंदा देशातील सोयाबीनचे बाजारभाव असतील. 

 

दररोज बाजारभाव, हवामान अंदाज, योजनेची माहिती, तज्ञांचे मान्सून बातम्या, शासकीय निर्णय , शेतीविषयक नवनवीन माहिती आणि इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा..

 

Leave a Comment

Close Visit maharashtra-live